March 30, 2026
गुनाट प्रतिनिधी एकनाथ थोरात
        शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जि.प. प्राथमीक शाळा बाभूळसर बुद्रुक या शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणारी विद्यार्थिनी कुमारी वेदांती वैभव वाळुंज हीने राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या *राष्ट्रीय गुणवंत शोध परीक्षेत (NSSE)* या परीक्षेत २०० पैकी २०० गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला.        

वेदांतीला तिच्या वर्गशिक्षिका श्रीमती प्रतिभा म्हस्के ( वाळुंज ) मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. शाळेचे मुख्याध्यापक सुभाष धनी सर, सर्व शिक्षकवृंद,तांदळी केंद्राचे केंद्रप्रमुख सुनिल घुमरे, बाभुळसर गावचे सरपंच गणेश मचाले,उपसरपंच सुनिल देशवंत,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष नागवडे , उपाध्यक्ष महेंद्र नागवडे, संजय मचाले व सर्व सदस्य यांनी वेदांतीचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच वेदांतीचे मूळ गाव शिंदोडी येथील सरपंच, उपसरपंच व सर्व शिंदोडी ग्रामस्थांनी वेदांतीचे अभिनंदन करून कौतुकाचा वर्षाव केला.