March 30, 2026

सुनील भंडारे पाटील 

                 पुणे जिल्ह्यामध्ये, विशेषता लोणीकंद भावडी परिसरातील अवैध गौण खनिज दगड खाण क्रशर यामुळे होणारे शासनाचे कोट्यावधी रुपयांची फसवणूक , परिसरातील शेतीचे मोठे नुकसान, सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांना होणारा त्रास, लोकांच्या आरोग्याला धोका यासाठी भरारी पथकाची कामगिरी महत्त्वाची होती, भरारी पथक रद्द केल्याने जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,

                 संबंधित दगड स्थान क्रशरमुळे अनेक तोटे समोर आले आहेत याबाबतीत नागरिकांनी अनेकदा आवाज उठवला असून समाजातील काही बोटावर मोजण्या इतपत लोकांचा फायदा सोडला तर लाखो जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे, त्याचप्रमाणे रॉयल्टिच्या कितीतरी लाख पटीने उत्खनन, वाहतूक डंपर बरोबर रॉयल्टीची पावती नसणे, खडी वाहतूक डंपर मुळे अपघात, रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, आसपासच्या पर्यावरणात मोठ्या प्रमाणात धूळ, धुळी मुळे लोकांना, लहान मुलांना दमा व श्वसनाचे आजार, आसपासची शेती नापीक, यामुळे जनता आता वैतागली आहे, 

                    भरारी पथकाच्या सर्वात मोठे धडाकेबाज कारवायांमुळे जनतेची सुटका होणार काय यामुळे लोकांना थोडा दिलासा मिळाला होता, परंतु खडी क्रेशर यंत्रणेमधील प्रतिनिधींनी म्होरक्या मार्फत अनेक खटाटोप केले, जनतेची पिळवणूक करण्यासाठी शासनाची फसवणूक लपवण्यासाठी संप करण्याचा बहाना, विक्रीच्या रेटमध्ये वाढ, म्होरक्या मार्फत मोठा आर्थिक गैर व्यवहार करून पुन्हा यंत्रणा चालू, गौण खनिज भरारी पथक रद्द, धडाडीच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची एका महिन्यात दोन वेळा बदली, हा सर्व खटाटोप कशासाठी, जनतेचे डोळे आता उघडले असून या चर्चेला नागरिकांमध्ये खूप मोठे उधाण आले आहे,
                   राजरोसपणे चाललेला हा भ्रष्टाचार, शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक, नागरिकांना त्रास, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे आंदोलन या आंदोलनाला जिल्हाधिकारी यांनी दिलेले उत्तर हे सर्व समाज उघड्या डोळ्यांनी पाहत असून शासनाला जनतेच्या प्रश्नापेक्षा बांधकाम व्यवसाय महत्त्वाचा आहे काय? येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनता याचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे,