March 30, 2026
गुणवताप्राप्त विद्यार्थी म्हणजे उद्याचे आयपीएस आय एएस घडविणारी पायाभरणीच – मानसिंग पाचुंदकर
हिवरे पिंपळे विद्यालयात गुणवताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
सणसवाडी प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिडगुले 
       पिंपळे हिवरे (तालुका शिरूर) गावात आता पर्यंत शेकडो आयपीएस , आयएएस आधिकारी झालेत . पहिलवान , फौजी , शिक्षक बनवणारे गाव अशी ख्यातीतर होतीच , पुढे या गुणवताप्राप्त मुलांमधूनही असे अधिकारीच तयार होतील , असे प्रतिपादन शिरूर आंबेगाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी NMS परीक्षेत गुणवता धारक  विद्यार्थ्यांचा सत्कार करताना केले .  

 ६६ उतीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५७ जनांना ४ वर्ष एकूण ४८ हजार स्कॉलरशिप मिळणार असलेचे प्रा . घोडके यांनी प्रास्ताविकात सांगून पाचुंदकर यांचेकडून हायस्कूल साठी मदतीच्या अपेक्षा व्यक्त केल्या . यावेळी सरपंच अश्विनी धुमाळ , माजी सरपंच संदिप सुरसे, सदाण्णा धुमाळ , माजी चेअरमन शहाजी जाधव, सोसायटीचे संचालक माऊली धुमाळ , कैलास धुमाळ , एकनाथ झेंडे, दतात्रय धुमाळ, बापुसो धुमाळ, सैनिक संघटना ध्यक्ष तुकाराम डफळ , माजी सरपंच अमोल भरणे , विशाल धुमाळ , रमेश धुमाळ , किसन पलांडे , चंद्रकांत धुमाळ, आप्पासो धुमाळ , अण्णासो धुमाळ, विकास धुमाळ , विक्रम धुमाळ ,प्रकाश धुमाळ , माजी उपसरपंच राजेंद्र धुमाळ , सुभाष धुमाळ, ARN न्युजचे संपादक सुर्यकांत शिर्के उपस्थीत होते .

पाचुंदकर व मान्यवरांचे हस्ते फेटा बांधून पुष्पगुच्छ देवून ५७ विद्यार्थी व मार्गदर्शक बोराटे सर, कल्यान कडेकर , निलेश धुमाळ व सर्व शिक्षकांचा फेटा बांधून सत्कार करणेत आला, .मनोज नायकोडी सर यांनी स्वागत केले . माजी सरपंच रमेश धुमाळ यांनी मानसिंग पांचुदकर यांचे कडून कंपन्यांच्या CSR  फंडातून शाळा इमारत व इतरही  मदतीची अपेक्षा व्यक्त केली . जाईभाई सर यांनी आभार मानले .