स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त याप्रसंगी प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम डीजे च्या तालावर तसेच सर्व विद्यार्थ्यांना झेंडे देऊन गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच ठिकठिकाणी परंपरेप्रमाणे प्रशालेला झेंडावंदन करण्याचा मान मिळाला. विद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण व ध्वजपूजन संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर व मानद सचिव अरविंदादादा ढमढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. ठिकठिकाणी ग्रामस्थांनीही प्रशालेतील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त खाऊ वाटप केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून प्रशालेचे प्रवेशद्वाराचे नूतनीकरण करण्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम याच दिवशी पार पाडण्यात आला.
भूमिपूजन करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे ,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, संचालक महेश ढमढेरे, परेश सातपुते, राजेश ढमढेरे, राहुल गुजर, विजय गुजर, राजेंद्र खोले, तळेगाव ढमढेरेच्या सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य संतोष ढमढेरे, झुबीन बागवान, मनोज आल्हाट, रोहिणी तोडकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, संदीप ढमढेरे, सुदर्शन तोडकर, विजय जेधे, नवींद्र जगताप, माजी उपसरपंच महेंद्र पवार ,कात्रज दूध उत्पादक संघाचे संचालक स्वप्निल ढमढेरे, गणेश ढमढेरे, प्रदीप ढमढेरे, सचिन पंडित, निवृत्ती जकाते, ग्रामसेवक भाऊसाहेब गोरे, माजी सैनिक पोपटराव भुजबळ व माजी सैनिक मित्रपरिवार, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक नवले, रेनबो इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सुनंदा लोले, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच गुलाबराव गवळे, जगदीश राऊतमारे, विलास पाटील, प्रभाकर मुसळे आदि उपस्थित होते.
हा कार्यक्रम पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत सर्व पाहुण्यांच्या समोर सादर केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून देशभक्तीपर समर गीते तसेच देशभक्तीपर नृत्य विद्यार्थ्यांनी सर्वांसमोर सादर केली. याप्रसंगी उपस्थित असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी शाळेच्या विकासासाठी भरघोस अशी मदत शाळेसाठी दिली. प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम संपल्यानंतर खाऊ वाटपही करण्यात आले.



