March 30, 2026
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
            तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

शिक्षक दिनानिमित्त आयोजीत या कार्यक्रमात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे, सांस्कृतिक विभागाचे शिवाजी आढाव तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका घेऊन इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तमरीत्या अध्यापन केले.  तसेच गणेशोत्सव असल्यामुळे प्रशालेत रांगोळी स्पर्धा व मेहंदी स्पर्धा यांचेही आयोजन करण्यात आले होते. प्रशालेतील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे वित्त लेखा अधिकारी सुरेंद्र सातपुते यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे यांनी शुभेच्छा दिल्या.