March 30, 2026
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
             कासारी येथील सौ.हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सहा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक सरोदे यांनी दिली.  

        एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी  रावळ अपूर्वा संतोष ही विद्यार्थीनी पात्र ठरली असून या विद्यार्थिनीस प्रती वर्ष १२ हजार प्रमाणे ४८ हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर सारथी  शिष्यवृत्तीसाठी अंकिता बबन दिघे,  सिद्धी सतीश रुके, क्षितिज माणिक कदम, प्रतीक संदिपान लावंड व  श्रेयस बबन रुके आदी पाच विद्यार्थी पात्र ठरले असून या विद्यार्थ्यांना  प्रत्येकी ३८ हजार ४०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र ढमढेरे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक अशोक सरोदे, ज्येष्ठ अध्यापिका नसीमा काझी, राजाराम साबळे, मार्गदर्शक शिक्षक शिवाजी पाखरे, अरुण भुजबळ, रावसाहेब थोरात, प्रमिला मोहिते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले आहे.