पुणे जिल्हा प्रतिनिधी
सदरील घटना बारामती तालुक्यातील सांगवी गावामधील आहे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून 12 एप्रिल 2023 रोजी सख्या चुलत भावाने आपल्या सख्ख्या चुलत भावाचा दगडाने ठेचून अत्यंत निर्दयीपणे खून केला होता या खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर सबंधित पुणे पोलीस दलातील कर्मचारी असणारा विक्रम गणपत फडतरे यास अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया यांनी बडतर्फ करून त्यास कायमस्वरूपी घरी बसवले आहे.
सदरील नराधमांनी एका दोन वर्षाच्या मुलीचे छत्रछाया हिरावून घेऊन तिला पोरक केले होते, या घटनेमध्ये मुख्य आरोपी नंबर एक विशाल फडतरे आरोपी नंबर दोन विक्रम फडतरे तसेच आरोपी नंबर तीन गणपत फडतरे यांनी अत्यंत नियोजनबद्धरित्या सदरील चुलत भाऊ विनोद फडतरे याचा शेतामध्ये दगडाने ठेचून खून केला होता.
विक्रम फडतरे हा पुणे मुख्यालयात नेमणुकीस असून तो बारामती तालुक्यातील सांगवी गावातील आहे या गुन्ह्यात पोलीस कर्मचारी विक्रम फडतरेचा भाऊ विशाल फडतरे हा मुख्य आरोपी आहे तर त्याच्यासह पोलीस कर्मचारी विक्रम फडतरे व त्याचे वडील गणपत फडतरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता , याप्रकरणी विक्रम फडतरेला पोलिसांनी अटक केली होती तो सध्या येरवडा कारागृहात आहे.पोलीस चौकशीमध्ये पोलीस कर्मचारी असणारा विक्रम फडतरे वडील आणि भावासोबत विनोद फडतरेच्या कुणाचा कट रचला होता ते पोलीस चौकशी पुढे आल्याने विक्रम फडतरेचे कृत्य पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे आहे असे नमूद करून अतिरिक्त पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी त्यास बडतर्फ केले आहे व त्यास कायमस्वरूपी घरी बसवले आहे.
