सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथे पुणे नगर महामार्ग च्या मधोमध गावाच्या पश्चिम बाजूच्या चौकामध्ये धोकादायक कठडा असल्याने लहान मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे, या महत्त्वाच्या महामार्गावर अशा अनेक समस्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष आहे,
संबंधित महामार्ग वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा समजला जात असून मोठ्या प्रमाणात वाढते औद्योगीकरण, रहदारी, तसेच पुढे महत्त्वाच्या शहरांना जोडणारा या मार्गाचे महत्त्व अनन्य साधारण आहे, दिवसभर वाहतूक दाट असते, रात्रीच्या वेळी वाहनांचे प्रमाण कमी असल्याने अति वेगवान गाड्यांचे वेग जास्त असल्याने चालकाला संबंधित कठडा न दिसल्याने कठड्यावर चढून अनेक अपघात घडलेले आहेत, तसेच कठड्यावर चढून गाड्या पलटी झाल्या आहेत अशा अपघात ग्रस्त गाड्यांना तसेच प्रवाशांना मदत केल्याचे स्थानिक रहिवाशी नितीन गव्हाणे, राजू गवदे, समीर इनामदार, तानाजी ढेरंगे, यांनी सांगितले,
संबंधित कठडा हा कोरेगाव भीमा गावच्या महत्त्वाच्या ठिकाणी असून अति वेगवान गाडी, कार या कठड्यावर चढल्यानंतर मोठा आवाज होतो, मध्यरात्री जर असा अपघात झाला तर गावांमधील लोकांना झोपेतून जाग येते असे ग्रामस्थ मदतीसाठी धाव घेतात, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हा कठडा काढून टाकावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत,
