सुनील भंडारे पाटील
माहेर संस्था संचलित कोरेगाव भीमा परिसरातील बचत गट महिलांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त कोरेगाव भीमा मध्ये रॅली काढण्यात आली,
भारत देशाला स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षा निमित्ताने कोरेगावभीमा परिसरातील महिला बचत गटातील महिलांची रॅली माहेर प्रशिक्षण वर्ग ते कोरेगावभीमा गाव, ग्रामपंचायत या परिसरात रॅली चे नियोजन करण्यात आले होते, यार रॅलीमध्ये महिला, तसेच मुले मुली यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता, तिरंगा हातामध्ये घेऊन, देशभक्ती, स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत, वडू बुद्रुक रस्त्यावरील सनराईज इंग्लिश मीडियम शाळेपासून, ग्रामपंचायत कोरेगाव भीमा पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली,


