March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
            कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथील धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव महिलांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,   

गेले नऊ दिवस चाललेल्या नवरात्र उत्सवामध्ये कोरेगाव भीमा येथील महिला बचत गटाच्या सर्व महिलांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता, दुर्गादेवी आरतीच्या वेळी सुमारे शंभर महिला एकत्र येऊन दुर्गादेवी महिषासुर मर्दानी हे स्तोत्र पठण करण्यात आले, हे स्तोत्र पठण करण्याचे हे दुसरे वर्ष असून, यामध्ये महिलांचा  मोठा सहभाग होता, गावातील ब्राह्मण श्रीनिवास काका कर्डेकर यांनी स्तोत्राबद्दल महिलांना सविस्तर माहिती दिली, त्याचप्रमाणे महिषासुर मर्दिनी स्तोत्र ची  पुस्तके वाटण्यात आली, दैनंदिन देवीच्या आरतीसाठी गावामधून 11 महिला बचत गटांनी सहभाग घेतला होता,  

त्यामध्ये स्वराज्य स्वयं सहाय्यता बचत गट, सत्यमेव जयते बचत गट, भैरवी बचत गट, इंदिरा बचत गट, सरस्वती बचत गट, सावित्रीबाई बचत गट, मुक्ताई बचत गट, स्वामिनी बचत गट, जिजाऊ बचत गट, मधील सर्व महिलांना आरतीचा मान मिळाला, या नवरात्र उत्सवाचे  आयोजन व नियोजन ग्रामपंचायत सदस्य वंदना विजय गव्हाणे, जया गव्हाणे, पुनम गव्हाणे, कांचन गव्हाणे,निर्मला राऊत, मनीषा सासवडे, निशा कांचन, धनश्री कुलकर्णी, अर्चना गव्हाणे, स्वाती गव्हाणे, संस्थापक माजी सरपंच विजयराव गव्हाणे पाटील, अध्यक्ष अनिल सव्वाशे व सर्व सभासद

यांनी केले होते,