संबंधित ठिकाणी भीमा नदीवर ब्रिटिश कालीन अतिशय आकर्षक असे चिरेबंदी दगडी बांधकाम केलेला ब्रिटिश कालीन पूल स्थित आहे, शिवाय या पुलाला सर सेनापती हंबीरराव मोहिते असे ऐतिहासिक नाव दिले आहे परंतु या पुलाच्या पूर्व बाजूला कोरेगाव भीमा ग्रामपंचायत हद्दीत पुणे नगर महामार्ग लगत कायम कचऱ्याचे ढीग साचलेले असतात, आजूबाजूला दाट लोकवस्ती तसेच कोरेगाव भीमा मुख्य गावठाण असल्याने संबंधित कचऱ्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे, वेगवेगळ्या साथीच्या आजाराची शक्यता आहे, महामार्गावरून जाणारे शिरूर हवेलीतील प्रवासी तसेच परिसरातील व्यावसायिक कचरा टाकत असल्याने येथे कायम कचऱ्याचा खच दिसत आहे,
ग्रामपंचायतच्या वतीने कचरा कचरा टाकणाऱ्यांना पकडण्यासाठी तसेच चाप बसण्यासाठी आपण सीसीटीव्ही च्या कक्षेत आहात असा बोर्ड लावला आहे, परंतु प्रत्यक्ष ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत, की या ठिकाणी कॅमेरे बसवले नाहीत, केवळ लोकांची दिशाभूल केली जाते का? असे गंभीर स्वरूपाचे प्रश्न उपस्थित होत असून, ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे,
