March 30, 2026

प्रतिनिधी वैभव पवार 

           केंदूर (ता शिरूर) येथील सात वर्षीय चिमुरडी तीर्था साकोरे हिने हिमालयातील ब्रह्मताल सर केला असून, तीर्थाच्या धाडसी कामगिरीबद्दल सरदार रघुनाथ ढवळे विद्यालयाकडून तीर्था साकोरेचा सन्मान करण्यात आला.
केंदूर तालुका शिरूर येथील विष्णु निवृत्ती साकोरे यांची नात असलेल्या तीर्था साकोरे या सात वर्षे वय असलेल्या व ईयत्ता दुसरीत शिक्षण घेत असलेल्या तीर्थाने महाराष्ट्रातील अनेक किल्ले सर केले.

              तीर्थाने नुकतेच हिमालयातील 3728मीटर व 12250फूट उंचीवरील ब्रम्हताल हा तीन दिवसात सर केला आहे. तीर्थाच्या या अनोख्या मोहिमेवेळी रात्रीचे तापमान 3 ते 5 अंश होते, तरी दिवसाचे तापमान 6 ते 8 अंश होते. तीर्था हिच्या अनोख्या कामगिरीमुळे तीर्थाला इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अनिल साकोरे, रामशेठ साकोरे, पांडुरंग ताथवडे, पोलीस पाटिल सतीश गावडे, भाऊसाहेब थिटे, श्रीहरी पऱ्हाड, विद्या थिटे, शिवाजी डेरे, विठ्ठलराव रहाणे, पुनाजी थिटे, विष्णु साकोरे, गोपीनाथ ताठे, पाटिलबुवा साकोरे, दत्तात्रय साकोरे, सुरेश गावडे, शिवराम भोसुरे, तुकाराम साकोरे, कोंडीभाऊ पवार, प्रशांत पऱ्हाड, सुदाम थिटे यासह आदी नागरिक उपस्थित होते.