March 30, 2026
सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक 
            कुंभारवळण(ता.पुरंदर)येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे अमृत मोहत्सव दिनानिमित्त झेंडावंदन वि.का.सो .चे चेअरमन बाबाजी कुंभारकर यांच्या हस्ते करण्यात आले.तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभार वळण येथील झेंडावंदन वि.का.सो चे व्हाईस चेअरमन ताराबाई कामथे यांच्या हस्ते करण्यात आले.

 कामथे मित्र परिवाराच्या वतीने कुंभारवळण गाव येथील   अकरा जेष्ठ नागरिकांना आंब्याची झाडे वाटप करण्यात आली.त्याचे फळ जे मिळेल त्यातील प्रथम गावाच्या मंदिरामध्ये पहिला तीर्थप्रसाद म्हणून अर्पण करायचे  असे माजी सरपंच विद्यमान सदस्य अमोल कामथे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.विविध मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा असेच झाडांची रोपे वाटप करण्यात आली.अविनाश जाधव व त्यांची कन्या यांच्या वाढदिवसानिमित्त हि झाडांची रोपे मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिली,दुसरी,तिसरी,चौथी,पाचवी ,सहावी,सातवी प्रत्येकी एकेक विद्यार्थी-विद्यार्थिनींना आंब्याच्या झाडांचे वाटप करण्यात आले.अमृत मोहत्सवानिमित्त खाऊ वाटप बाबासो कुंभारकर ,सरपंच अश्विनी खळदकर व विद्यमान सदस्या नीलिमा कुंभारकर यांच्या हस्ते केळी वाटप करण्यात आले.

        यावेळी सरपंच अश्विनी खळदकर,उपसरपंच नंदू बापू कामठे,विद्यमान सदस्य अमोल कामठे , संदीप कामठे ,सदस्या मंजुषा गायकवाड ,रंजना खळदकर,नीलिमा कुंभारकर,मंडळ अधिकारी प्रभावती कोरे,तलाठी विपुल पाटील,ग्रामसेवक आकाश सावंत,ध्वज पूजन सावित्री कोंडे ,शाळा समिती व्यवस्थापन अध्यक्ष स्वाती कोंडे,नाना कामठे तंटामुक्ती अध्यक्ष ,रमेश कामठे तंटामुक्ती उपाध्यक्ष ,नंदू नेटके,सुभाष कुंभारकर,माजी सरपंच संजय खळदकर,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शीतल खैरे,ललिता भोसले,संदीप दरेकर,रुपेश हाडके,चंद्रकांत कामठे,निलेश भापकर,राजेंद्र कुंभारकर,चांदणी शिरोळकर,शिपाई सुनील खळदकर,संतोष ईभाड,जिल्हा प.प्रा.शाळेच्या मुख्याध्यपिका जयश्री काकडे गावातील युवक वर्ग जेष्ठ नागरिक महिला बहुसंख्येने उपस्थित होते .