सुनील भंडारे पाटील
करंदी (तालुका शिरूर) येथे वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर
बिबट्याला पिंजऱ्यामध्ये कैद करण्यात यश आले असून, संबंधित बिबट्याला
जुन्नर येथील बिबट निवारण केंद्रात सोडण्यात आले आहे,
गावामध्ये बिबट्याचे अस्तित्व अनेक दिवसापासून होते तसेच
बिबट्याचे सततचे दर्शन, व जनावरांवर होणारे हल्ले याला लोक वैतागली होती,
गावामधील दरेकर वस्ती येथील बाळासाहेब दरेकर यांच्या पोल्ट्री शेजारी
बिबट्याचा सततचा वावर असल्याने या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता,
त्यानंतर सकाळच्या सुमारास गणेश दरेकर पोल्ट्री फार्मवर गेले असता, त्यांना
एक बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे निदर्शनास आले,
याबाबतीत शिरूर वनक्षेत्र
यांना माहिती देण्यात आली, वनक्षेत्र अधिकारी मनोहर मसेकर, वनरक्षक बबन दहातोंडे,
वनमजूर आनंद हरगुडे, यांनी तातडीने धाव घेतली, सदर बिबट्याचे वनपरिक्षेत्र
कार्यालय शिरूर येथे प्राथमिक तपासणीनंतर त्याला जुन्नर येथील बिबट निवारण
केंद्रात सोडण्यात आले, यावेळी पोलीस पाटील वंदना साबळे, उपसरपंच पांडुरंग
ढोकले, दत्ता दरेकर,अतुल दरेकर, अरविंद ढोकले, प्रमोद दरेकर, प्रशांत
दरेकर, दिलीप दरेकर, दत्तात्रय भागवत, अजय भोसले, नारायण अवचर, प्रकाश
पंचमुख, व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,

