March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
          कोरेगाव भीमा ( तालुका शिरूर ), पेरणे (तालुका हवेली) येथील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वास्तू विजयस्तंभ, पूल तसेच राहते घर याला टोरेंट कंपनीच्या सीएनजी गॅस लाईन पासून धोका आहे, हे काम ताबडतोब थांबवावे यासाठीचे निवेदन तसेच तक्रार विजयस्तंभ इन्चार्ज जमादार खंडोजी माळवदकर ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट रोहन माळवदकर (जमादार), खंडोजी माळवदकर यांचे 7 वे वंशज यांनी जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे तक्रार केली आहे,

            1 जानेवारी 1818 रोजी कोरेगाव भीमा येथे मराठा विरुद्ध इंग्रज यांच्यामध्ये बचावात्मक लढाई झाली, याची स्मृती म्हणून या ठिकाणी विजयस्तंभ बांधण्यात आला,(खर्च 50,786/-रु ) सदर जयस्तंभाचे इन्चार्ज म्हणून जमादार खंडोजी माळवदकर यांची नियुक्ती करण्यात आली, तेव्हापासून आजपर्यंत जयस्तंभ माळवदकर यांच्या ताब्यात असून पेरणे व कोरेगाव भीमा या दोन गावांना जोडण्यासाठी “fitzgibbon Bridge” नावाचा दगडी बांधकाम मधील पुल उभारला (खर्च 2,52,338/-रु)आता हा पूल सरसेनापती हंबीरराव मोहिते पूल म्हणून ओळखला जातो,

            गेल्या काही दिवसांपासून गुजरात मधील टोरेंट कंपनीच्या वतीने पुलाच्या पायथ्याच्या व जयस्तंभ पासून काही अंतरावर मोठे ड्रिल मशीन लावून जमिनीच्या खालून खड्डे घेण्याचे काम सुरू आहे, हे काम न विचारता बेकायदेशीर रित्या चालू असून सदर बाब अतिशय गंभीर आहे, याचा ऐतिहासिक ब्रिटिश कालीन पुल तसेच जयस्तंभ, घराला धोका होण्याची दाट शक्यता आहे, याविषयी ठेकेदारशी चर्चा केली असता आम्ही सरकारी परवानगी काढले आहेत असे उत्तर मिळत आहे,

               नदीच्या खालून व पुलाच्या बाजूने पाईपलाईन करून कोणीतरी आतंकवादी, देशद्रोही, नक्षलवादी, समाजकंटक, दंगलखोर या पाईपलाईनचा चुकीच्या पद्धतीने वापर करून जयस्तंभ, पूल तसेच घर बॉम्बस्फोट करण्याचा कट रचू शकतात किंवा इतर आतंकवादी पद्धत वापरून मोठे षडयंत्र रचू शकतात, ज्यामुळे आमच्या तसेच जनसमुदायाच्या जीवितास मोठा धोका होऊ शकतो, याचा दोष स्थानिक ग्रामस्थ व नागरिकांना किंवा माळवदकर यांच्या कुटुंबीयांना दिला जाऊ शकतो, त्यामुळे तातडीने या पाईपलाईनचे काम थांबवावे अशी मागणी पत्राद्वारे माळवदकर यांनी केली आहे,