मेळाव्याचे उद्घाटन रुग्ण कल्याण समितीचे सन्माननीय सदस्य पांडुरंग गावडे,उद्योजक राहुल चव्हाण,संकेत वाघमारे ,अप्पर जिल्हाधिकारी तथा सहसंचालक( तांत्रिक ) बोरावके , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागनाथ येमपल्ले ,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय वाघ,एन एच एम समन्वयक गणेश जगताप यांच्या उपस्थितीत पार पडला
मेळाव्यात तज्ञ डॉक्टर स्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ,अस्थी रोग तज्ञ,शल्य चिकीत्सक, नाक कान घसा तज्ञ,नेत्र रोग तज्ञ,दंत चिकित्सक इ सेवांच्या तज्ञ डॉक्टर्सनी उपस्थित राहून सेवा दिल्या.मेळाव्यामध्ये एकूण 948 रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले तसेच “निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे” या संकल्पने अंतर्गत 252 18+ पुरुषांची तपासणी आणि उपचार करण्यात आले.,पैकी सहा रुग्णांना संदर्भ सेवा देण्यात आली.
