सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
वाद्यांचे गजरात नितीन बानगुडे पाटील व आमदार पवार यांचे स्वागत होऊन शिवप्रतिमेला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार घालून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली . यावेळी मार्केट कमीटीचे सभापती काकासो कोरेकर , माजी अध्यक्ष प्रकाश पवार , आरती भुजबळ ,समता परीषदेचे विभाग अध्यक्ष सोमनाथ भुजबळ , आरपीआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवि काळे , माजी अध्यक्ष बाळासो नरके , पोपट भुजबळ , सोपान गवारे, आयोजक राहूल कर्पे, गणेश तोडकर , भुजबळ व सहकारी आणी शिवप्रेमी मोठ्या संखेने उपस्थीत होते .
अठरा पगडजातीचे मावळे मातीसाठी भरायला तयार होते , राजासाठी नव्ह तर राज्यासाठी लढले व अन्याय मोगल राजवटीविरुद्ध स्वराज्य उभारलं , असे बानगुडे पाटलांनी तासभर शिवचरीत्रावर प्रेक्षकांना खिळवून ठेवले . विशाल पुष्पहार मान्यवरांना घालत केक कापून आ . अशोक पवार यांचा वाढदिवस साजरा करणेत आला . माजी उपसरपंच गणेश तोडकर यांनी पवार यांचे कामाचे कौतुक करत आम्ही १४ सहकारी मित्रांनी त्यातून उतराई होणेसाठी व्याखानचे आयोजन केलेचे सांगीतले . अशोक पवार यांनी समाजाची कामे करत जनतेच्या अडचणी सोडवण्याची ग्वाही दिली .


