March 30, 2026

 

आंबेगाव  मिलिंद टेमकर
           निरगुडसर तालुका आंबेगाव येथील बेटवस्ती वरील शेतातील विद्युत डी.पी जवळ .अतिशय दुर्दैवी घटणा या ठिकाणी विद्युत प्रवाहाचा झटका लागून  तिनं मेंढ्या मृत्यू मुखी पडल्या आहेत.
          

संबंधित ठिकाणी गावातील प्रतेक डीपी वर मोकळया वायरिंग आहेत, त्यामुळे अनेक घटना घडत आहेत  , प्रत्येक  गावात महावितरण चे अधिकारी व वायेर मेन नेमले आहे ते काय करतात?,वायेर मेन ला पण त्यापासून धोका आहे ,या ठीकाणी माणसांना देखील धोका होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे ,

अधिकारी फक्त लाईट बिल वसुली साठी ,गोरगरिबां त्रास देण्यासाठी ,भरसाठ बिज बिले देण्यासाठी आहे ,का? असा सवाल सर्व सामान्य माणसाला पडलेला आहे,  महावितरण विभागाकडून गोरगरिबांच्या लाईट बिलासाठी पिळवणूक करून कनेक्शन कट करून, लोकांना त्रास देत आहेत, तसेच होणाऱ्या घटनांना जीवित हनीला जबाबदार आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे,

विद्युत रोहित्रावरील उघड्या केबल्स, तसेच उघड्या पेट्या यापासून मुक्या प्राण्यांना, होणारा धोका  तसेच शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांना होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी विद्युत महावितरण कंपनीने त्वरित दुरुस्त्या कराव्या अशी मागणी होत आहे,