March 30, 2026

सणसवाडी ज्ञानेश्वर मिगुले

          आषाढी एकादशी निमित श्री क्षेत्र पंढरपुर येथे १० लाखांवर वारकरी भावींकांचा महापुर लोटला . तरी कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर आठवडाभरापासून आधीच भावीक येवुन वारीचा आनंद घेवून गेले . देहू येथून निघालेल्या तुकाराम महाराजाचे पालखी सोहळ्याला भिजपावसाने सतावले,      

तरी भर पावसात भिजत वारीमध्ये अनेक अडचणींना सामोरे जात आदले दिवशीच पंढरीत वारकरी पोचले . सतत भिज पावसामुळे वाखरी ते विठ्ठल मंदीरा पर्यंत दरसाल प्रमाणे गर्दी जाणवली नाही . नाहीतर चंद्रभागे पासून वाखरी पर्यंत दहा किलो मिटर भावीकांचा महासागर लोटत असतो .

फेर फुगड्या प्रत्येक दिंडीत होतात , पण यावेळी पावसामुळे थोड्याफार दिंड्यातील भावीकांनी तो आनंद घेतला , पण बाकी रेनकोटच्या च रांगा दिसत होत्या . खेडचे आमदार दिलीप मोहीते यांनीही येवून खेड तालुक्यातील निरगुडीचे धर्म शाळेचे उद्घाटन केले .पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक

पुजेसाठी येवून गेले तेंव्हा चोख बंदोबस्त होता .

 तोवर इतर भावीकांनी पुंडलीक मंदिरालगत थांबून एक आठवण म्हणून सेल्फी व फोटो काढत वारीचा आनंद घेतला . तुकाराम महाराजांच्या सणसवाडीचे दिंडीतील हभप गरुड महाराज व समवेतचे वारकरी विशेष लक्ष वेधून घेत होते .