March 30, 2026
अष्टापुर हनुमानवाडी शाळेचे जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत यश

अष्टापुर हनुमानवाडी शाळेचे जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत यश

हवेली प्रतिनिधी

नेताजी सैनिक स्कूल,फुलगाव, ता.हवेली, जि.पुणे याठिकाणी पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत झालेल्या स्पर्धेमध्ये हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमानवाडी (अष्टापूर) ने जिल्हा पातळीवरील अतिशय सुरेख कामगिरी करत एक नवीन इतिहास रचला व जिल्हास्तरीय लोकनृत्य प्रकारात द्वितीय क्रमांक पटकविला आणि हनुमानवाडी शाळेचे नाव जिल्ह्याच्या यादीत समाविष्ट केले.

गेली अडीच – तीन महिने सहभागी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती यावर मेहनत घेत होते व त्याचेच फळ म्हणजे हा जिल्हा स्तरावरील विजय होय.दिवसभर उत्सुकता ताणणाऱ्या प्रसंगाचा अनुभव उपस्थित पालक व ग्रामस्थ यांनी घेतला.जिल्हा पातळीवरील या विजयाने सर्वांना मोहित करुन टाकले,

या संपूर्ण प्रक्रियेत दृश्य-अदृश्यपणे आर्थिक व सक्षम साथ देणारे हात म्हणजे रयत शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष रामदास पाटीलबुवा कोतवाल,फुलगाव याठिकाणी जाण्यायेण्याची सोय करणारे अष्टापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच व चिंतामणी टूर अँड ट्रॅव्हल्सचे मालक गणेश दशरथ कोतवाल यांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत केली.

अष्टापूर गावचे पोलीस पाटील विलास कोतवाल,विद्यार्थ्याचे स्वागत करणारे उद्योगपती अनिल निवृत्ती कोतवाल ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन कोतवाल, उपाध्यक्ष विशाल कोतवाल,राहूल गीताराम कोतवाल, प्रकाश कांतीलाल कोतवाल, संदीप मुर्टे शा.व्य.समितीचे माजी अध्यक्ष सूर्यकांत कोतवाल यांनी बहुमोल योगदान दिले शाळेचे मुख्याध्यापक सचिन सदाशिव साळुंखे, उपशिक्षिका उषा भानुदास बोर्डे यांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे मान्यवर व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.