March 30, 2026
श्री बालाजी विद्यालयात प्रा वसंतराव हंकारे यांचे व्याख्यान सदाशिव अण्णा पवार यांची माहिती 

श्री बालाजी विद्यालयात प्राध्यापक वसंतराव हंकारे यांचे व्याख्यान सदाशिव अण्णा पवार यांची माहिती 

सुनील भंडारे पाटील 

श्री बालाजी शिक्षण प्रसार मंडळाच्या श्री बालाजी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी व पालकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच मन परिवर्तनासाठी त्याचप्रमाणे समाजामधील अनिष्ट गोष्टींचा विचार करून परिवर्तन करण्यासाठी युवा व्याख्याते प्राध्यापक वसंतराव हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, हंकारे यांनी न समजलेले देव माणसं म्हणजे आई वडील या विषयावर प्रभावी पणे माहिती सांगितली,

व्याख्यानाच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली, संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष सदाशिव अण्णा पवार यांच्या हस्ते उपस्थितचा सन्मान करण्यात आला, या कार्यक्रमासाठी विद्याधाम प्रशाला, आश्रम शाळा, शिरूर विजयमाला स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, ज्ञानगंगा विश्वविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय पांडुरंग अण्णा थोरात, या शिरूर परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला,

हंकारे यांनी आपल्या व्याख्यानातून आई-वडिलांची भूमिका व कष्ट संस्कार तसेच मार्गदर्शन याविषयीचे महत्त्व पटवून सांगितले, आई-वडिलांचे आपल्या जीवनातील महत्त्व जबाबदाऱ्या, तसेच आपल्या जीवनातील त्यांचे योगदान याबाबतीत संदेश दिला,

मुलांनी आपल्या आई-वडिलांची सेवा करावी आई-वडिलांच्या विचारांशी एकनिष्ठ राहावे, आपल्या वर्तनातून आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी येईल असे वागू नये, अशा अनेक गोष्टी त्यांनी पटवून दिल्या, याप्रसंगी मुलांनी आई-वडिलांना त्रास देणार नाही, देशाचे चांगले नागरिक होऊ अशी प्रतिज्ञा केली,

प्राचार्य नीरज राव, मुख्याध्यापिका स्वाती थोरात, मुख्याध्यापक लगड, शिशिर जगताप, रासकर सर, शिक्षिका सुप्रिया मॅडम, नवनाथ शेंडे सर, तरटे मॅडम,त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते,

व्याख्यानांमधील मार्गदर्शन ऐकून अक्षरशा उपस्थितीच्या डोळ्यांना अश्रू अनावर झाले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विनायक म्हसवडे यांनी केले, प्राध्यापक वसंतराव हंकारे यांनी आपल्या व्याख्यानातून महत्त्वाचे असे मार्गदर्शन केल्याने, सर्वांनी आभार व्यक्त केले, तसेच संस्थेचे अभिनंदन केले, अशी माहिती श्री बालाजी शिक्षण संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष सदाशिव अण्णा पवार यांनी दिली,