March 30, 2026
दरेकरवाडी जिल्हा परिषद शाळेत बालदिंडी उत्साहात

सुनील भंडारे पाटील 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेकरवाडी (ता शिरूर) येथे आषाढी एकादशी निम्मित गावामध्ये बालदिंडी आयोजित केली होती,

या दिंडी मध्ये सर्व मुलांनी खूपच छान वेशभूषा केली होती. तसेच ही दिंडी संपूर्ण गावामध्ये प्रदक्षिणा घालत संपूर्ण दिंडी मध्ये मुलांनी अभंग तसेच भावगीते यांचा स्पीकर द्वारे लावून गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्मित केले होते.

गावातील महिलांनी उत्स्फूर्द स्वागत करुन मुलांच्या आनंदात सहभागी झाले होते. दिंडी चे गावाचे रिंगण पूर्ण झाल्यानंतर मुलांना वारकरी म्हणून पंगत मध्ये गोड शीरा, भात आणि केळी चा आस्वाद घेतला.

 जिल्हा परिषद शाळा मध्ये नेहमीच असे पारंपरिक उपक्रम राबविले जातात. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक पिंगळे सर, कुंभार सर, मोरे मॅडम, आरती दरेकर मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर दरेकर, उपाध्यक्ष अश्विनी कड, सदस्य शंकर दरेकर, संदीप दरेकर, सुरेखा दरेकर, दिपाली दरेकर, माजी उपसरपंच मारुती दरेकर, अमोल आवटे, सोमनाथ दरेकर, निता दरेकर, आरती साळुंखे आणि मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.