सणसवाडी येथे मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सवाचे आयोजन
सुनील भंडारे पाटील
सणसवाडी (तालुका शिरूर) येथे मयूर नगर च्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील नवरात्र उत्सवाचे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले आहे, नऊ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये आयोजकांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित आप्पा दरेकर, मनसे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांनी दिली,
या नवरात्र उत्सवामध्ये विवेध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती होणार असून, कार्यक्रमासाठी सनसवाडी तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यक्रम स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत,
कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी भव्य मंडप, व बसण्यासाठी लाल कलरचे कार्पेट जमिनीवर टाकण्यात आले असून, आकर्षक विद्युत रोषणाई, त्याचप्रमाणे डीजे साऊंड सिस्टिम लावण्यात आली आहे, त्याचप्रमाणे पुरुष व महिला असे दोन वेगवेगळे विभाग करण्यात आले आहेत,
स्टेजवर दुर्गा मातेची भव्य मूर्ती प्रस्थापित करण्यात आली असून या ठिकाणी घटस्थापना देखील करण्यात आली आहे, गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गा माता नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे, या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे,
शिरूर हवेली मतदार संघाचे माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या मार्गदर्शनाने दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळाचे संस्थापक पंडित आप्पा दरेकर , मार्गदर्शक रामदास दरेकर यांच्या नियोजनातून व मार्गदर्शनातून अध्यक्ष लक्ष्मण दरेकर, उपाध्यक्ष अशोक करडे, तसेच सर्व संचालक मंडळ हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडणार आहेत,
