March 30, 2026
दुःखद…! लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे निधन 

दुःखद…! लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे निधन 

सुनील भंडारे पाटील 

लोणीकंद (तालुका हवेली) पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार साहेब (वय 50 वर्ष)यांचे आज रात्री दोन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले,

सदैव आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असणाऱ्या कुंभार साहेबांची घटना कळून लोणीकंद परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांनी या परिसरामध्ये गुन्हेगारीला चांगलाच आळा बसवला होता, कुंभार साहेबांचे नाव ऐकले की, चांगले चांगले गुन्हेगारांचे धाबे दणाणले होते,

तसेच लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात आले होते, कुठल्याही अडचणीच्या संदर्भात साहेबांना फोन गेला की, तातडीने त्या संदर्भात हालचाली व्हायच्या, त्यांची नियुक्ती पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत लोणीकंद पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती, त्यांच्या नियुक्तीनंतर पोलीस स्टेशनमध्ये खूप मोठे चांगले बदल झाले होते,

त्यांची आठवण लोणीकंद पोलीस स्टेशन सर्व कर्मचारी, व पंचक्रोशीत होत आहे, त्यांचे पश्चात आई, पत्नी ,एक मुलगी एक मुलगा एक मोठा भाऊ, मुलगा सिद्धेश वय 13 वर्षे ,मुलगी सिद्धी वय 19 वर्षे (BAMS जयसिंगपूर येथे करत आहे), असा परिवार आहे, त्यांचा अंत्यविधी त्यांचे मूळ गाव कोल्हापूर येथे होणार आहे,