March 30, 2026
पेरणेफाटा ते पिंपरी सांडस रस्त्याची दुर्दशा प्रवास करणे मुश्किल रस्त्याला ओढ्याचे स्वरूप

पेरणेफाटा ते पिंपरी सांडस रस्त्याची दुर्दशा प्रवास करणे मुश्किल रस्त्याला ओढ्याचे स्वरूप

सुनील भंडारे पाटील 

पुणे नगर महामार्गा लगत पेरणे फाटा (तालुका हवेली) या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्याच्या दुर्दशेमुळे अक्षरशा रस्त्याला ओढ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे, नागरिकांना व ग्रामस्थांना या मार्गावरून प्रवास करणे मुश्किल झाले आहे,

संबंधित रस्त्यावर पेरणे गावानजीक पोल फॅक्टरी जवळ रस्त्यावरून पूर आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित असून पेरणे फाट्यापासून पुढे पेरणेगाव, डोंगरगाव, बुरकेगाव, पिंपरी सांडस, नाव्ही सांडस, श्रीक्षेत्र बोल्हाई माता मंदिर, अशा महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा हा रस्ता आहे,

भीमा नदीच्या पट्ट्यातील काठावर बसलेल्या या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बागायची क्षेत्र असून शेतीशी निगडित कुटीर उद्योग आहेत, झपाट्याने रहदारी वाढत असल्याने प्रवाशांची संख्या, विद्यार्थी, व इतर प्रवाशांची दाट वर्दळ असल्याने रस्त्यावरील खड्डे, अरुंद रस्ता, रस्त्यावरील पाणी यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत, प्रवाशांना जीव मोठे धरून प्रवास करावा लागत आहे,

रस्त्याच्या दुरावस्थेकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे, दिसून आंधळेपणाचे सोंग घेत आहे, संबंधित रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी ग्रामस्थ व नागरिक करत आहेत, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे,