रास्ता रोको 2015 आंदोलनातून माजी आमदार अशोक बापू पवार व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता
सुनील भंडारे पाटील
चासकमान धरणाचे पाणी उजनी धरणात सोडू नये यासाठी 2015 या वर्षी माजी आमदार अशोक पवार यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते,सदरच्या रास्ता रोको प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यातून त्यांची व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे, हा निकाल शिरूर न्यायालयाने जाहीर केला आहे,
दि. ०२ नोव्हेंबर २०१५ रोजी माजी आमदार अशोक पवार सह अन्य लोकांनी चासकमान धरणाचे पाणी उजनी धरणात सोडू नये अन्यथा ते शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्यायाचे ठरेल यासाठी आंदोलन केले होते. सदरचे आंदोलन हे बेकायदेशीर असल्याचे ठरवुन पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता,
सदर आंदोलन प्रकरणी शिरुर (घोडनदी) येथील फौजदारी न्यायालयात शिरुरचे माजी आमदार अशोक पवार, माजी जि.प.सदस्य शेखर पाचुंदकर, मानसिंग पाचुंदकर, बाळासाहेब नरके, दिलीप मोकाशी व अन्य असे २८ लोकांविरुध्द बेकायदेशीररित्या पुणे – नगर रस्ता अडविला म्हणुन भा.दं.वि.कलम १४३, ३४१ व मुं. पो.कायदा कलम १३५, ३७ नुसार गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचा दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी घोडनदी न्यायालयाने निकाल दिला व सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
आरोपींचे वतीने ज्येष्ठ वकील अॅड. शिरीष लोळगे व अॅड. शिवशंकर हिलाळ यांनी कामकाज पाहिले व युक्तीवाद केला. त्यानंतर शिरूर न्यायालयाचे न्यायमूर्ती वानखेडे यांनी हा निकाल जाहीर केला,
