ॲड.रेगे यांच्या तीस वर्षाच्या संघर्षाला अखेर यश आज विजयी मेळाव्यामध्ये सोडणार उपोषण
सुनील भंडारे पाटील
गेल्या 30 वर्षापासून दगडखाण कामगार आणि आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी एडवोकेट बी एम रेगे आणि संतुलन संस्थेच्या संचालिका एडवोकेट पल्लवी यांचा संघर्ष सुरू होता मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत वाघेश्वर नगर येथे गेल्या 14 दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाला अखेर यश आले असून याबाबतचे सविस्तर वृत्त भरारी न्यूजने सातत्याने प्रसिद्ध केले , आणि शासनाला व प्रशासनाला झुकावे लागले,
पुणे महानगरपालिका येथील पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम , अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये दगडखान कामगारांना आहे त्या जागेवर पुणे महानगरपालिकेकडून घर बांधून देणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय आज देण्यात आल्यामुळे दगडखाण कामगारांनी पुणे महापालिकेवर एडवोकेट रेगे यांना खांद्यावर उचलून दिवाळी साजरी केली आहे आज विजयी मेळावा घेऊनच उपोषण सोडणार असल्याचे प्रतिपादन एडवोकेट बी एम रेगे यांनी केले आहे.
ईश्वर देता है तो कभी कभी छप्पर फाडके देता है.. या उक्तीप्रमाणे आज पुणे महानगरपालिका येथे झालेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये दगडखाण त्यांच्या आहेत त्या जागेवर महानगरपालिकेकडून घरे बांधून देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला असून या पुढील काळात या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे दारू, जुगार असे काळे धंदे चालू देणार नाही, दगडखाण कामगारांची एक आदर्श वसाहत या ठिकाणी निर्माण करू … ॲड बी एम रेगे
