सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणूक मध्ये लोणीकंद पेरणे गटाची निवडणूक अटीतटीची होणार असून संपूर्ण परिसराचे लक्ष या गटाकडे लागले आहे, लोणीकंद पेरणे गटामध्ये सर्वात अधिक लोकसंख्या असणारे गाव हे पेरणे गाव आहे,
पेरणे गावातील बाबाजी उर्फ निलेश आनंदा वाळके हे गावचे माजी सरपंच असून त्यांना राजकारणाच्या बुद्धिबळ खेळातील महत्त्वाचा मोहरा समजला जात आहे, गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांना अधिकचे मताधिक्य दिले होते, शिवाय निवडणुकीच्या निकाला अगोदरच्या दिवशी सायंकाळी आमदार माऊली आबा कटके यांच्या विजयाचे फटाके पेरणे फाटा चौकात फोडले होते,
बाबाजींची राजकीय कारकीर्द पाहता त्यांनी पेरणे गावचे आदर्श सरपंच म्हणून कामकाज पाहिले असून ग्रामपंचायत पासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वच निवडणुकांमध्ये निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती आहे, त्यांनी ज्या उमेदवाराचे काम केले तो निवडून आला, असा राजकीय इतिहास आहे,
त्यांनी या अगोदर पंचायत समितीच्या दोन निवडणुकांमध्ये हार वाघ होऊन पचवली आहे, तसेच चालू पंचवार्षिक मध्ये जनतेतून सरपंच पदासाठी त्यांच्या सौभाग्यवतींना अपयश मिळाल्याने आता पेरणे तसेच पंचक्रोशीतून बाबाजीं विषयी सहानुभूतीची लाट तयार झाली आहे, बाबाजींचे विचार सद्यस्थितीत अमलात आणण्याचे काम मोठा वर्ग या भागात तयार झाला आहे,
त्यामुळे आगामी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणूक मध्ये लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये महत्त्वाच्या पेरणे गावातील बाबाजी उर्फ निलेश वाळके यांचा कल जिकडे तो उमेदवार निवडून येणार अशी चर्चा सध्या लोणीकंद पेरणे गटात चालू आहे,