लोणीकंद येथे सेवा सप्ताहाचे यशस्वी आयोजन
सुनील भंडारे पाटील
लोणीकंद (तालुका हवेली) येथील नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये १७ सप्टेंबर२०२५ ते २ऑक्टोबर २०२५ सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते,
या सेवा सप्ताह मध्ये सर्वात महत्त्वाचा गाव पातळीवरील विषय म्हणजे शिव पनंद रस्ते मोकळे करून देने याविषयी महत्त्वाचा ठराव मान्य करण्यात आला ,पानंद रस्ते विषयी मोहीम अंतर्गत एकंदर सहा पानंदरस्ते असून यामध्ये शिव पानंद रस्ते मोजणी आणि सीमांकन करून खुले करणे, तसेच एकंदर सहा पानंद रस्ते असून मुख्यमंत्री सहभागी अभियान यामध्ये गावाने सहभाग घेऊन 17 सप्टेंबर 31 डिसेंबर 25 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे,
तसेच स्वस्थ नारी अभियान अंतर्गत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये १६५ महिलांची तपासणी करण्यात आली याप्रसंगी पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष , भाजपा पुणे जिल्हा कोर कमिटीचे सदस्य प्रदीप दादा कंद ,सरपंच मोनिका श्रीकांत कंद, उपसरपंच सुजाता अमृत कंद,
ग्रामपंचायत सदस्य आशिष गायकवाड, नंदकुमार कंद, सुधीर कंद, सोनाली जगताप, दिपाली राऊत, राहुल शिंदे, सुप्रिया कंद, गौरव झुरंगे, सागर कंद, सुलोचना झुरुंगे, सरस्वती दळवी, ओंकार कंद, प्रियंका झुरंगे, कावेरी कंद, अतुल मगर, त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी जे एच बोरावणे, व यासह सर्व शासकीय विभागातील कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
