March 30, 2026
सणसवाडी दुर्गामाता उत्सवात समाजोपयोगी उपक्रम 

सणसवाडी दुर्गामाता उत्सवात समाजोपयोगी उपक्रम 

सुनील भंडारे पाटील

सणसवाडी तालुका (शिरूर येथील) मयूर नगर दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित दुर्गामाता उत्सवात सामाजिक भान जपत समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.

या प्रसंगी माजी आमदार अशोकबापु पवार यांच्या हस्ते गरजवंत महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. समाजातील गरजूंना मदत करून त्यांचा सन्मान करण्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

तसेच “खेळ रंगला पैठणीचा” या सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्या महिलांना बक्षिसांचे वितरण देखील पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

दुर्गामाता उत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने सांस्कृतिक, प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भक्तांसाठी रेड कार्पेट स्वागत, सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था यासह उत्तम नियोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला एम.एस.सी.बी. जामखेडचे नितीन महाजन ,एम‌.एस.सी.बी शिक्रापूर सुमित जाधव, एचडीएफसी बँक मॅनेजर शिंदे , मार्केट कमिटीचे माजी सदस्य दत्तात्रय हरगुडे, उपसरपंच राजेंद्र दरेकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वैभव यादव, माजी उपसरपंच विजयराज दरेकर, मनसे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी पंडितआप्पा दरेकर, शिरूर पंचायत समिती माजी सदस्या सविता दरेकर, माजी सरपंच सुनंदा दरेकर, ग्रामपंचायत सदस्या ललिता दरेकर, सुनीता दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर, कैलास दरेकर, उद्योजक प्रशांत दरेकर, निलेश नाना दरेकर, विठ्ठल दरेकर, नवनाथ दरेकर, बाळकृष्ण दरेकर, मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण दरेकर, उपाध्यक्ष अशोक करडे, खजिनदार रविराज जुनवणे, सचिव उत्तम दरेकर, संचालक अनिल गोटे, पंढरीनाथ गोरडे, सलीम खान, संतोष शेळके, अशोक खवले, राहुल नागरे, शरद खरात, प्रमोद गाडे अशोक ढेकळे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी व दुर्गामाता भक्त उपस्थित होते.

सणसवाडीतील दुर्गामाता उत्सव हा केवळ धार्मिक आनंदापुरता मर्यादित न राहता समाजोपयोगी कार्याशी जोडला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले आहे.