सत्याग्रहातांची प्रकृती खालावली आंदोलकांचा रास्ता रोकोचा इशारा
सुनील भंडारे पाटील
गेली तीस वर्षापासून गायरान जमिनीवर राहणारे दगडखाण कामगार, वन जमिनीवर राहणारे आदिवासी यांची सातबारा वर नोंद करावी या प्रलंबित मागणीसाठी एडवोकेट बी.एम. रेगे सह दगडखाण कामगार गेली दोन दिवसापासून वाघोली येथील वाघेश्वरनगर येथे बेमुदत अन्न त्याग सत्याग्रह करत आहेत ,
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची सरकारी डॉक्टरांनी तपासणी केली असता दहाही उपोषण कर्त्यांची प्रकृती गंभीर होतअसल्याचे अहवाल येताच आंदोलक पुढील काळात रास्ता रोको चक्काजाम व जिल्हाधीकारी कार्यालय घेराव सारखे आंदोलन करून रस्त्यावर उतरण्याची आंदोलकांनी लेखी इशारा दिलाअसल्याची माहिती अँड. पल्लवी रेगे व सत्याग्रहींनी दिला आहे.
