March 30, 2026
पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांचा वाडेबोल्हाई येथे मेळावा

पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांचा वाडेबोल्हाई येथे मेळावा

सुनील भंडारे पाटील

हवेली तालुक्यातील मुळा मुठा नदी काठच्या मांजरी बु ” व मांजरी खु ” पासून खामगावटेक हिंगणगाव पर्यंत 22 गावातील कृषिपंपाला वॉटर मीटर बसवू नये ‘ व भरमसाठ पाणीपट्टी आकारणी करण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात . कृतिसमिती च्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले होते .

उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत . शासनाच्या निर्णयावर स्थगिती दिली आहे या महत्वपूर्ण निर्णयाची माहिती देण्यासाठी आज बोल्हाईमाता मंदिरा समोर शेतकरी मेळावा संपन्न होऊन मा . उच्च न्यायालयाच्या निर्णण्याची अम्मल बजावणी करून ड्रेनेज सांडपाण्यावर पाणीपट्टी न भरण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला .

या प्रसंगी भारतातील विविध राज्यात अतिवृष्टीने बळी गेलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

तसेच उच्च न्यायालयातील कृति समितीचे कामकाज पाहण्यासाठी नियुक्त केलेले जेष्ठ वकिल मा . अश्विनकुमार देवरे / मनिष केळकर / अंकिता बडगेरी यांचे शेतकऱ्याचे वतीने अभिनंदन करणारा ठराव पास करण्यात आला .

या प्रसंगी कृतिसमितीचे पदाधिकारी मा . सरपंच कुशाबा गावडे ‘ यशंवत संचालक श्रीहरी कोतवाल ‘ यांची भाषणे झाली

कृतिसमिती च्या सर्व कामकाजाची माहिती सचिव अंकुश कोतवाल यांनी दिली ‘

कृतिसमितीचे अध्यक्ष मा . आमदार बापूसाहेब पठारे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला