ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करावी रयत शेतकरी संघटनेची मागणी
सुनील भंडारे पाटील
हवेली तालुका परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हाताशी आलेले पिक गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले असून मानसिक धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे हवेली तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकनऱयांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. खत, बी-बियाण्याच्या वाढत्या किंमती, ‘ शेती मालाला नसलेला भाव यामुळे आधीच आर्थिक सकटात असलेला बळाराजा अतिवृष्टीमुळे आर्थिक विवंचनेत सापडला आहे,
अतिवृष्टीमुळे ‘ पिकांचे नुकसान ‘ झाले आहे, त्याठिकाणचे शासनाने तात्काळ पंचेनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
तसेच ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी रयत शेतकरी सघटनेचे रामदास कोतवाल , विशाल कोतवाल, उमेश कोतवाल यांनी केली आहे.
