सोलापूर महामार्ग ते पुणे नगर महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था
सुनील भंडारे पाटील
सोलापूर रोड ते नगर रोड या दोन महामार्ग जोडणारा रस्ता म्हणजे कोरेगाव भिवरी , गोते मळा शिरसवडी ,वाडेबोलाई, डोंगरगाव ,पेरणे फाटा ह्या रोडची अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे ,
हवेली तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील संबंधित रस्त्याच्या अत्यंत वाईट अवस्था झाल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेले दहा वर्षांमध्ये झाले नसून अनेक वेळा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत,
गेंड्याची कातडी पांगरलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या कारभारावर परिसरातून प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे, रस्त्याच्या दुर्दशेमध्ये अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत, याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न नागरिकांमधून व प्रवाशांमधून व्यक्त होत आहे,
ऐन पावसाळ्यात हा रस्ता वाहून गेल्याने त्याचा फार मोठा त्रास नागरिकांना व प्रवाशांना होत आहे, वीस दिवसापूर्वी प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वस्तू स्थितीची पाहणी करून गेले आहे , अनेक वेळा तक्रार करूनही तरी देखिल या रस्त्याचची देखभाल अजून केलेली नाही तातडीने पुढील आठवड्या पर्यंत या रस्त्याचे काम नाही केलं तर रयत शेतकरी संघटना तीव्र असे मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे, अशी माहिती रयत शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल यांनी दिली आहे,
