March 30, 2026
लोणीकंद पेरणे जि प गटात पै किरण साकोरे यांची संकल्प यात्रा

लोणीकंद पेरणे जि प गटात किरण साकोरे यांची आदमापूर,कोल्हापूर,अक्कलकोट,तुळजापूर संकल्प यात्रा उत्साहात 

सुनील भंडारे पाटील

लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य पदासाठी पैलवान किरण साकोरे यांची जोरदार तयारी चालली असून त्यांनी या जिल्हा परिषद गटा मधील लोकांसाठी आयोध्या काशीचे हजारो लोकांना दर्शन घडवले आहे, त्याचप्रमाणे आदमापूर, कोल्हापूर ,अक्कलकोट ,तुळजापूर या देवस्थानचे दर्शन घेऊन हजारो लोकांनी त्यांना पुढील वाटचालीस आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत,

पुणे जिल्हा भाजपा कोर कमिटीचे सदस्य ज्येष्ठ मार्गदर्शक प्रदीप दादा कंद, शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्या मार्गदर्शनाने पैलवान किरण साकोरे यांच्या संकल्प यात्रेमध्ये सुख सुविधांनी अनुकूल वातावरणामध्ये मतदार संघातील लोकांचा उत्साह गगनाला भिडलेला आहे, रोजच्या दैनंदिन संघर्ष मय जीवनात शेतकरी तसेच इतर कामगार वर्ग यांना उद्याचे प्लॅनिंग हे उद्यावरच राहते, परंतु पैलवान किरण साकोरे यांच्या देवदर्शन संकल्प यात्रेमुळे वेळात वेळ काढून नागरिक या यात्रेमध्ये उस्फूर्त सहभाग घेताना दिसत आहेत,

आतापर्यंतच्या कालावधीत ट्रेन द्वारे अयोध्या काशी या तिन यात्रा सुखरूप पार पडल्या आहेत, तसेच महाराष्ट्रात कुलदैवत व आराध्य दैवत असणाऱ्या श्री महालक्ष्मी कोल्हापूर, आई तुळजाभवानी तुळजापूर, श्री संत बाळूमामा आदमापूर, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या देवदर्शन यात्रा उत्साहात पार पडत आहेत, या माध्यमातून मतदार संघातील हजारो लोकांनी पैलवान किरण साकोरे यांना भावी वाटचालीसाठी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत,

संकल्प यात्रे मधील सुख सुविधा शुद्ध पिण्याचे पाणी, नाश्ता , त्याचप्रमाणे जेवण या सर्व गोष्टी वेळेत, त्याचप्रमाणे आधुनिक सुख सुविधेच्या बस गाड्या यामुळे प्रवास सुखरूप होत आहे, पैलवान किरण साकोरे यांच्या देवदर्शन संकल्प यात्रेमधील उत्तम नियोजनामुळे सर्वांनी पैलवान किरण साकोरे यांना भरभरून आशीर्वाद दिले आहेत, त्याचप्रमाणे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे,