योगेश झुरुंगे यांच्या पुढाकाराने चैत्यभूमी दर्शन व कात्रज सर्पोद्यान सहल
सुनील भंडारे पाटील
लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेसाठी माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या पुढाकाराने मुंबई येथील पवित्र चैत्यभूमी दर्शन यात्रेचे तसेच कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील सरपोद्यान सहलीचे भव्य आयोजन करण्यात आले. या दोन्ही उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दोनशे ते अडीचशे मुलं–मुली व भाविकांनी या यात्रांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला.
कात्रज सर्पोद्यान पाहण्यासाठी बुर्केगाव येथून दोन बस रवाना करण्यात आल्या. शेकडो मुलं–मुलींची ही शैक्षणिक सहल अत्यंत आनंदात पार पडली. सकाळी लोणीकंद येथे सर्वांसाठी चहा–नाश्त्याची व्यवस्था केल्यानंतर सहलीचा ताफा मंगलमय वातावरणात रवाना झाला.
लोणीकंद–पेरणे गटातील नागरिकांसाठी आयोजित चैत्यभूमी दर्शन यात्रेसाठीही दोन बस शेकडो भाविकांसह रविवारी सकाळी मुंबईकडे मार्गस्थ झाल्या. यात्रेकरूंसाठी चहा–नाश्ता, जेवण, निवास यांची उत्तम व शिस्तबद्ध व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली. भाविकांनी या सेवाभावी नियोजनाचे मनापासून कौतुक केले.
यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी आणि ताफा मार्गस्थ करण्यासाठी माजी सरपंच योगेश झुरुंगे, आयोजक सागर झुरुंगे, दीपक झुरुंगे, राजेश झुरुंगे, स्वप्निल झुरुंगे, भारत झुरुंगे, भाऊसाहेब ठोंबरे, भीमा ठोंबरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धार्मिक, सामाजिक व जनतेसाठी उपयुक्त असे उपक्रम सातत्याने राबविल्याबद्दल इच्छुक उमेदवार योगेश झुरुंगे यांच्याबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक भावना असून, त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे आयोजक सागर झुरुंगे यांनी भरारी न्यूजशी बोलताना सांगितले.
