केंदुर पाबळ जि प गटात विकास नाना गायकवाड विकासाचा देवदूत
सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यात लक्षवेधी ठरणाऱ्या केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटात विकास नाना गायकवाड यांची सध्या जोरदार चर्चा चालू असून त्यांच्या रूपाने विकासाचा देवदूतच मतदारांना लाभला असल्याचे जिल्हा परिषद गटातील लोकांकडून सांगितले जात आहे,
विकास नाना गायकवाड यांनी कुठल्याही राजकीय पदाची अपेक्षा न बाळगता गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेचे धोरण अंगीकृत केले असून या गटातील महत्त्वाच्या असणाऱ्या केंदूर आणि पाबळ या भागामध्ये विकासाचा ओघ लावला आहे,
लहानपणापासून अत्यंत खडतर जीवनाचा प्रवास करत त्यांनी आपला आदर्श समाजासमोर उभा केला आहे, जीवनाच्या प्रथम स्वकमाइतून त्यांनी सोन्याची छत्रपती शिवरायांची लहान मूर्ती गळ्यात घालण्यासाठी तयार केली, याचा त्यांना खूप मोठा स्वाभिमान आहे,
केंदूर पाबळ गटामध्ये गेल्या दहा वर्षापासून गोरगरीब जनतेसाठी त्यांनी दरवर्षी मोफत विवाह सोहळ्याचे आयोजन करून आतापर्यंत 1000 च्या वर लग्न लावून दिले आहेत, त्याचप्रमाणे उन्हाळ्यातील अत्यंत गंभीर पाण्याचा प्रश्न सोडवण्याकडे कायम त्यांचा कल आहे, टँकरनी पाणीपुरवठा करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे,
इतर अनेक प्रश्नांना वाचा फोडून त्यांनी केंदुर पाबळ गटातील जनतेला त्यांनी मदत केल्याने या गटातील भावी जिल्हा परिषद म्हणून विकास नाना गायकवाड यांची नियुक्ती झाली तर विकासाचा देवदूतच मिळाला असल्याचे नागरिकांकडून सांगितलेजात आहे,
