केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटात चक्रीवादळ विकास नाना गायकवाड रिंगणात
सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंदुर पाबळ जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने विकास नाना गायकवाड यांची उमेदवारी जाहीर झाल्याने या गटात निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे, गायकवाड यांच्या इंटरीने केंदूर पाबळ गटात निवडणुकीचे वातावरण बदलले आहे,
नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रफुल्ल शिवले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, शिवले यांनी निवडणुकीची जोरदार तयारी करत, गेल्या अनेक महिन्यांच्या नियोजनात त्यांनी देवदर्शन यात्रा मतदारांच्या गाठीभेटी अशी तयारी चालू असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक इच्छुक असताना तोडीसतोड उमेदवार देण्यासाठी शोध मोहीम चालू होती,
अशात युद्ध पातळीवर निर्णय घेऊन हीवरे येथील विकास नाना गायकवाड यांना उमेदवार दिल्याची वार्ता जिल्हा परिषद गटामध्ये समजताच केंदुर पाबळ जिल्हा परिषद गटामध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गायकवाड यांना पाठिंबा दिल्याची चर्चा रंगू लागली आहे, विकास नाना गायकवाड यांच्या माध्यमातून केंदूर पाबळ गटात मोठे वादळ दाखल झाल्याचे दिसत आहे,
