केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटात इच्छुकांची रेलचेल अनेक मुरब्बी आमने-सामने
सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यातील तोंडावर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटात इच्छुकांची यादी वाढली असून अनेक मुरब्बी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या केंदूर पाबळ गटात रंगू लागली आहे,
सध्या जिल्ह्यात लक्षवेधी ठरणारी केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटाची निवडणूक असून मतदार संघात एकूण बारा गावंपैकी केंदूर आणि पाबळ ही दोन मोठ्या मताधिक्याची गावे आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद गटाची धुरा केंदुर पाबळ या महत्त्वाच्या दोन गावांवर अवलंबून आहे,
जिल्हा परिषद गटातील एकूण मतदान चाळीस हजाराच्या आसपास असून केंदूर पाबळ या दोन गावांचे मतदान सुमारे पंचवीस हजार एवढे आहे, तर उरलेले इतर मतदान इतर दहा गावांमध्ये असल्याने पुढील काळात या दोन गावांची भूमिका काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,
सद्यस्थितीत काही इच्छुक उमेदवारांनी मौन पाळले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रकाश पवार, प्रमोद पार्हाड, भाजपाकडून अमित सोनवणे,जयश्रीताई पलांडे, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून शंकर दादा जांभळकर, तसेच सनी थिटे, सतीश साकोरे त्याचप्रमाणे निवडणुकीची जय्यत तयारी करणारे प्रफुल्ल शिवले अशी नावे चर्चेत असून शिवले यांच्या व्यतिरिक्त इतर उमेदवार वेट अँड वॉचेवर आहेत,
