पै किरण साकोरे यांनी स्वखर्चातून केले पेरणे कानिफनाथ मंदिर परिसराचे काँक्रिटीकरण
सुनील भंडारे पाटील
लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये पैलवान किरण साकोरे यांनी स्वखर्चातून विकास कामांचा धडाका लावला असून नुकतेच त्यांनी जिल्हा परिषद गटातील पेरणे गावामधील कानिफनाथ मंदिर परिसरातील मंदिरासमोरील सुमारे 1200 स्क्वेअर फुटाचा भाग सिमेंटने कॉंक्रिटीकरण करून दिले,
पुणे जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गट या गटामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते पुणे जिल्हा कोर कमिटीचे सदस्य, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप दादा कंद, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद, यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान किरण साकोरे यांनी जिल्हा परिषद गटामध्ये स्वखर्चातून विकासकामांची मालिका लावली आहे,
नागरिकांच्या रस्ते, विद्युत पुरवठा, तसेच इतर अडचणींबरोबर त्यांनी आता पेरणे येथील कानिफनाथ मंदिरासमोरील परिसर सिमेंट काँक्रीट करून दिला, त्यांच्या या कामाबद्दल परिसरातून कौतुक व्यक्त होत असून, देवदर्शन यात्रेबरोबर विकास कामांचा धडाका लावल्याने नागरिकांचा पाठिंबा वाढत चालला आहे,
या प्रसंगी पैलवान किरण साकोरे, माऊली अण्णा वाळके सभापती, दशरथ नाना वाळके सरपंच, दत्ता आबा वाळके माजी चेअरमन, अक्षय वाळके माजी उपसरपंच, सुजित अण्णा वाळके, दीपक शेठ वाळके माजी उपसरपंच, प्रदीप भाऊ वाळके ग्रामपंचायत सदस्य, शिवाजी नाना वाळके माजी उपसरपंच, राजेंद्र वाघमारे माजी उपसरपंच, सुहास धर्माधिकारी मा अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, अविनाश शेठ वाळके पाटील अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, माजी सरपंच मच्छिंद्र तात्या मुंडकर, इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
