March 30, 2026
योगेश झुरुंगे आयोजित राजस्थान यात्रेच्या पहिल्या टप्प्याचे भव्य प्रस्थान

योगेश झुरुंगे आयोजित राजस्थान यात्रेच्या पहिल्या टप्प्याचे भव्य प्रस्थान

पुणे प्रतिनिधी

लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील योगेशभाऊ झुरुंगे मित्रपरिवाराच्या वतीने मायबाप जनतेसाठी राजस्थान येथील विविध पवित्र स्थळांच्या दर्शनासाठी आयोजित करण्यात आलेल्या यात्रेच्या पहिल्या टप्प्याचे भव्य प्रस्थान बुधवार, दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.

या यात्रेच्या निमित्ताने यात्रेकरूंना मार्गदर्शन करण्यासाठी संवाद मेळाव्याचे आयोजन सकाळी ९ वाजता पेरणे फाटा येथील सिद्धेश्वर पॅलेस येथे करण्यात आले आहे. मेळाव्यानंतर यात्रेकरूंसाठी स्नेहभोजाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर यात्रा राजस्थानकडे मार्गस्थ होणार आहे.

लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, यात्रेत सहभागी भाविकांना यात्रेचे नियोजन, शिस्त व आवश्यक सूचना देण्यासाठी हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या दर्शन यात्रेमध्ये श्री खाटू श्याम मंदिर, श्री सालासर बालाजी मंदिर, सांवरीया सेठ, अजमेर शरीफ यांसह आणखी दोन पवित्र स्थळांचे खास सरप्राईज यात्रेकरूंकरिता ठेवण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

यात्रेदरम्यान आरामदायी लक्झरी बसची व्यवस्था, रुचकर व सकस भोजन, प्राथमिक आरोग्य उपचार सुविधा, तसेच राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक यात्रेकरूची विशेष काळजी घेण्यासाठी संयोजक व स्वयंसेवक तत्पर राहणार असून, संपूर्ण यात्रा शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडणार आहे. या यात्रेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अशी माहिती सागर झुरंगे, राजेश झुरुंगे यांनी दिली,