March 30, 2026
पै किरण साकोरे यांनी स्वखर्चातून केले पिंपरी सांडस भरतवाडी रस्त्याचे मुरुमीकरण

पै किरण साकोरे यांनी स्वखर्चातून केले पिंपरी सांडस भरतवाडी रस्त्याचे मुरुमीकरण

सुनील भंडारे पाटील

लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील पिंपरी सांडस (तालुका हवेली) मध्ये भरतवाडी येथील सुमारे बाराशे ते पंधराशे मीटर रस्त्याचे मुरमीकरण करून पैलवान किरण साकोरे यांनी समाजासमोर एक आदर्श तयार केला आहे,

ज्येष्ठ मार्गदर्शक लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामधील महचे व्यक्तिमत्व प्रदीप दादा कंद यांच्या मार्गदर्शनाने पिंपरी सांडस येथील भरतवाडी मधील शेतकऱ्यांची अडचण पाहता हे काम हाती घेण्यात आले, येथील शेतकऱ्यांची शेतामध्ये जाण्यासाठी तसेच शेतमाल बाहेर काढण्यासाठी पावसाळ्याच्या काळामध्ये खूप मोठी अडचण होती,

संबंधित शेतकऱ्यांनी प्रदीप दादा कंद तसेच पैलवान किरण साकोरे यांची भेट घेऊन हि अडचण सांगितली कंद यांनी तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा अडचणीचा प्रश्न मार्गी लावला, गेल्या 15 ते 20 वर्षापासून शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी खूप अडथळा येत होता,

पैलवान किरण साकोरे यांनी प्रदीप दादा कंद यांच्या आदेशाचे पालन करून तातडीने पावलं उचलत पिंपरी सांडस मध्ये भरतवाडी येथील सुमारे बाराशे ते पंधराशे मीटर रस्त्याचे मुरमीकरण करण्यात आले, रस्त्यामधील मोठे खड्डे बुजून हा मार्ग काढण्यात आला, पैलवान किरण साकोरे यांच्या या सामाजिक कामाबद्दल परिसरातून कौतुक होत असून पिंपरी सांडस ग्रामस्थांनी साकोरे यांचे आभार व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,