लोणीकंद पेरणे जि प गटात विकासाचे वारे पै किरण साकोरे
सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यामध्ये लक्षवेधी ठरणाऱ्या लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये पैलवान किरण साकोरे यांची नागरिकांवरची छाप वाढत चालली असून देवदर्शन यात्रा, अडचणीतील रस्त्यांची स्वखर्चाने कामे यामुळे त्यांनी जनतेच्या मनात घर केले आहे,
अत्यंत मनमिळावू, स्वभावाने गरीब, भेटेल त्याच्या पायावर हात तसेच समाजातील विकास कामांना केलेली सुरुवात यामुळे पैलवान किरण साकोरे यांनी समाजातील लाखो मने जिंकली आहेत, जीवनात कितीही कणखर कष्ट असोत अडी अडचणींना सामोरे जात चेहऱ्यावर कायम हसू ठेवत भेटल्यावर दोन मिनिट का होईना प्रत्येकाशी बोलणे यामुळे साकोरे हे कायम चर्चेत आहेत,
जिल्हा परिषद गटातील कणखर नेतृत्व असणारे प्रदीप दादा कंद यांच्या विचारांची जोपासना करत त्यांच्या मार्गदर्शनाने साकोरे यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची जोरदार तयारी केली असून मतदारसंघात सर्वांच्या तोंडून पैलवान किरण साकोरे यांचे नाव पुढे येत आहे,
महाराष्ट्रातील कुलदैवत असणाऱ्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तुळजापूर, श्री महालक्ष्मी कोल्हापूर, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट, श्री बाळूमामा आदमापूर, या संकल्प यात्रा बस द्वारे त्याचप्रमाणे अयोध्या काशी दर्शन यात्रा ट्रेन द्वारे काढून हजारो लोकांना देवदर्शन घडवले,
नागपूर येथील दीक्षाभूमी अभिवादनासाठी मतदारसंघातील हजारो बांधवांना घेऊन जाण्याचे भाग्य किरण साकोरे यांनी आत्मसात केले, या सर्व देवदर्शन यात्रांमुळे त्यांनी जनतेच्या मनात चांगलेच घर केले असून आधुनिक श्रावण बाळ म्हणून त्यांची मतदारसंघात चांगलीच चर्चा रंगली आहे, लोणीकंद पेरणे मतदारसंघात विकासाचे वारे म्हणजे पैलवान किरण साकोरे असा उल्लेख केला जात आहे,
