16 ऑगस्ट दिलीप भोसले सर वाढदिवस विशेष
माहिती संकलन सुनील भंडारे पाटील (संपादक भरारी न्यूज)
परिचय
नाव: दिलीप वामनराव भोसले
पद: सचिव फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती
बालपण शिक्षण: जीवन शिक्षण मंदिर मराठी शाळा कोरेगाव भीमा
माध्यमिक शिक्षण: छत्रपती संभाजी हायस्कूल कोरेगाव भीमा
उच्च माध्यमिक शिक्षण: विष्णूजी शेकोजी सातव ज्युनिअर कॉलेज वाघोली
महाविद्यालयीन शिक्षण: आप्पासाहेब जेधे कॉलेज शुक्रवार पेठ पुणे
आवड व छंद: प्रवास ,पर्यटन स्थळे पाहणे, व्यायाम करणे
खेळ: क्रिकेट आवडता खेळ, खोखो हॉलीबॉल कुस्ती, कबड्डीमध्ये प्राविण्य उत्कृष्ट बॅट्समन, बॉलर, ऑल राऊंडर कप्तान,
आदर्श प्रतिष्ठान मंडळाचे सचिव म्हणून पद भूषविले गावच्या प्रत्येक अप क्रमात सहभाग दहीहंडी मध्ये विशेष सहभाग
सन 1994 साली फ्रेंड्स असोसिएशन संस्थेची स्थापना झाली तेव्हापासून संचालक पदी निवड
सन 1996 साली शिरूर तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा उदय झाला आज संस्था तीसव्या वर्षात पदार्पण करत आहे,
1998 साली फ्रेंड्स ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित कोरेगाव भीमा या पतसंस्थेचे चेअरमन म्हणून पद भूषवले त्यावेळी गोरगरिबांना कर्जाची मदत केली
व्यवसाय: वीस ते पंचवीस वर्ष वडिलांचा ट्रान्सपोर्ट व स्टॅण्ड सप्लायर चा व्यवसाय केला, पीएसआय होण्याची इच्छा होती, पण व्यवसायामुळे दुर्लक्ष झाले व्यवसाय मात्र उत्तमरीत्या केला, नंतर वडिलांकडून रियल इस्टेट जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायाचे बाळकडू मिळाले,
आतापर्यंत असा कोणताही राज्य मार्ग नाही त्या भागात डील केलेले नाही,
अनेक कंपन्यांचे व्यवहार यशस्वी केले, त्यामध्ये कल्याणी फोर्स कंपनीचा 16 एकर जमीन ,सणसवाडी इलेक्ट्रॉनिक्स, ओम साई मिल्स, कोरेगाव भीमा या व्यवहारातून कोरेगाव मध्ये स्वतःची भव्य बिल्डिंग बांधली, प्लॉट घेतले,
कोरेगाव भीमा मध्ये राहून पुणे सारख्या शहरांमध्ये जमिनीचे व्यवहार केले, वाकड ,बाणेर ,खराडी मध्ये हाय क्लास सोसायटीमध्ये टू बीएचके फ्लॅट घेतला जमिनीमध्ये गुंतवणूक केली,
सन 2008 पासून फ्रेंड्स एज्युकेशन या संस्थेवर सचिव म्हणून भरीव काम करत आहे या कामात संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले व सर्व संचालकांची भक्कम साथ मिळाली, सन 2024 साली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली
सन 2024 मध्ये भरारी न्युज कडून शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पुरस्कार मिळाला
शाळेची भव्य इमारत उभी करण्यास योगदान व शाळेसाठी खेळाचे मैदानासाठी जागा विकत घेण्याचे प्रमुख सहभाग
(सन 2025) वर्षापासून सद्यस्थितीत पूर्ण ऑनलाईन शिक्षण वेबसाईट चालू केली
मदत: गरीब व होतकरू गरजू विद्यार्थ्यांना मदत शिक्षक व कर्मचाऱ्यांना अडचणीच्या वेळी मदत करणारा संघटन कौशल्य प्रभावी नेतृत्व मित्राची जान असणारा धडाडीचा अभ्यासू व्यक्तिमत्व असणारा अवलिया,
सामान्य कुटुंबातील व्यक्ती ते यशस्वी उद्योजक व शैक्षणिक क्षेत्रातील सर्वांचे लाडके भोसले सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
स्वातंत्र्य दिन 2025
भरारी न्युज कडून पुरस्कार
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी आवारात वृक्षारोपण केले जुलै 2025
शिक्षकांचा गौरव सन्मान
आजी आजोबा मेळावा आयोजन
नर्सरी सेक्शन पालखी आयोजन
शिक्षक दिन साजरा केला
फ्रेंड स स्कूल चे सचिव श्री दिलीप भोसले तहसीलदार श्री बाळासाहेब म्हस्के साहेबांचा संस्थेतर्फे मानचिन्ह देऊन सन्मान करताना
शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन
पर्यावरण दिन साजरा करण्यात आला
माहिती संकलन सुनील भंडारे पाटील (संपादक भरारी न्यूज)
