अतुल वायकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
सुनील भंडारे पाटील
मावळ तालुक्यातील सुपुत्र शंभू भक्त अतुल खंडूजी वायकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी नुकताच छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरी तुळापूर येथील संगमेश्वर मंदिराच्या प्रांगणात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला,
सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये नेहमीच मोलाची मदत करण्यामध्ये अतुल वायकर यांचा सिंहाचा वाटा असून परिसरातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे, पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून पुढील पिढीला ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ येऊ नये या उद्देशाने फळे फुले आणि औषधी झाडे लावून पर्यावरण समतोल राखण्यासाठी आपल्या वाढदिवसाच्या अतिरिक्त खर्च न करता तो खर्च वृक्षारोपण सारखे सामाजिक कार्याला खर्च करून वायकर यांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे ,
यावेळी शंभुभक्त, मराठा सेवक संघाचे सुनिल खंडुजी राऊत,श्री श्रेत्रतुळापुर विविध विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन शिवाजी शिवले , मा.सरपंच माऊली शिवले, उपाध्यक्ष संजय आबा शिवले, मा.चेअरमन राजाराम शिवले संचालक हनुमंत शिवले उपस्थित होते,
छत्रपती शिवराय अभियान केखले पन्हाळा कोल्हापुर,राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ नवी मुंबई,शिवकार्य क्षेत्र जगभरात पोहोचवणारे शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट ठाणे मावळ ग्रुप व शिवराय ग्रुपचे सर्व संचालक यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,याप्रसंगी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
