March 30, 2026
शिरूर तालुका प्रतिनिधी
        मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्या प्रमाणे व सरकारला 3 वेळा संधी देऊनही दिलेल्या शब्दाला न जागल्याने, मुंबई ला धडक सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलनाला अंतरावली सराटी येथून दिनांक 20 जानेवारी 2024 पासून मुंबई पायी मराठा आरक्षण यात्रा सुरुवात झाली.

           सर्व प्रकारचे नियोजन करून या आरक्षण पायी यात्रेला शुभारंभ झाला. यात मार्ग, मुक्काम व ठरलेल्या तारखेला मुंबईत ठाण मांडून चक्का जाम करून या दिलेला शब्द न पाळणाऱ्या सरकारला ठणकावून सांगून आरक्षण घेऊनच या आंदोलनाची सांगता होईल हार्दिक ठाम निर्धार व शब्द मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाला दिलेला शब्द. असा प्रामाणिक व सच्चा, शब्दावर ठाम असणारे नेतृत्व लाभले महत्वाचे एकच पाटलांचा एकच ध्यास आहे गोर गरीब माय बाप मराठ्यांच्या मुलांना आरक्षण मिळवून देणं…!यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाला सांगितले कि आता आरक्षण घेऊनच परत येणार…

           जालना,नगर, शिरूर पुणे, हवेली, या तालुक्यातून लोक महिला अबाल वृद्ध माता भगिनी सकाळ पासून या योध्याच्या स्वागतासाठी रस्त्यावर थांबलेली होती, जागोजागी येणाऱ्या पायी, गाडीतील सहभागी आंदोलकांना नास्ता, जेवण पाणी, बिस्कीट आदींचे वाटप केले जात आहे, अनेक ठिकाणीऐतिहाशीक गाणी,पोवाडे,भजन, क्रांती गीते डीजे आदी माध्यम लावून एक

             चैतन्यमयी वातावरण यामार्गांवर दिसत आहे.गावा गावातून याचे काटे कोर नियोजन केले जात आहे, पोलीस यंत्रणा ही यासाठी सज्ज व या मुंबई पायी मराठा आरक्षण यात्रेला सहकार्य करत असताना पाहिले. उस्फुर्त व वेळेची तमा न बाळगता महिला भगिनी मूलं युवक स्वागतासाठी सज्ज होती नगर रोड अक्षरशः भगव्या झेंड्या नी केशरीया झाला होता व पुढेही हिच स्थिती पहावयास मिळाली अभूतपूर्व असे पायी मुंबई यात्रा होणार यात तीळ मात्र शंका नसावी, सरकारा आता घाम फुटल्याशिवाय राहणार नाही कारण भरपूर पळ वाटा काढल्या जाळ टाकले, फसवण्याचा प्रयत्न केले, नाना प्रकार केले पण मनोज जरांगे पाटील तसूभरही आपल्या शब्दा पासून ढळलेले नाहीत.

             जरांगे पाटील यांच्या पायी मराठा आरक्षण मुंबई पदयात्रेचा पहिला मुक्काम मातोरी (ता.शिरूर) याठिकाणी होऊन मातोरी हे पाटील यांचे जन्मगाव आहे. याठिकाणी आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्याच्या वतीने ३ स्वतंत्र स्टॉलची उभारणी केली गेली होती. यात बुंदी, भात, शिपी आमटी, भाकरी,  सहा ट्रक भांडी ठेवन्यात आली. पुढचा मुक्काम करंजी घाट, रांजणगाव गणपती 22जानेवारी 2024,पुढे दुपारचे जेवणाचे नियोजन कोरेगाव भिमा येथे होते सकाळ पासून महिला भागिनी अनेक मंडळ, सकल मराठा समाज जमेल त्या पद्धतीने अन्न, पाणी, बिस्कीट भाजी भाकरी, चपाती ई येणाऱ्या सहभागी आंदोलकांना देत होते.

          ठरलेल्या वेळे पेक्षा अधिकचा वेळ लागला तरीही नगर रोडला जनसमुदायाची गर्दी हटत नव्हती, कोरेगाव भिमा येथे आजू बाजूच्या पंचक्रोशीतील वदू आपटी, वाजेवाडी, चौफुला, केंदूर, धमारी ई ठिकाणची लोक रस्त्यावर दुतरफा उभी होती पुढे वदू बुद्रुक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पेरणे फाटा, लोणीकंद, वाघोली, व चंदनगर खराडी बायपास येथे पहाटेमुंबई पायी मराठा आरक्षण आंदोलन यात्रा पोहचली.

              या मार्गांवर पाटलांनी समाजाला उद्देशून आपल्या भावना व्यक्त करताना म्हंटले कि माय बाप हो मी या तुमच्या जीवावर मुंबईला धडक देत आहे आपण शांततेच्या मार्गने हे आंदोलन यशश्वि करायचे व हे सरकार फसवं आहे आपण यांना 3 वेळा संधी दिली तरीही काही होईना पण मी शब्द देतो आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही वं महत्वाचे कोण काय काय बोलले ते आत्ता महत्वाचे नाही पण मी विसरलेलो नाही यांनाचा पक्का कार्यक्रम होणार. आणि कस आरक्षण मिळत नाही तेच आता बघायचे, होऊ द्या मुंबई बंद, यांच्या(सरकारच्या ) नाड्या थंड…. आता माघार नाही.हे आंदोलन यात्रा दिनांक 26 जानेवारी 2014 ला चेंबूर वरून ऐतिहाशिक आझाद मैदान येथून मा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होणार आहे.