कोरेगाव भीमा येथील फ्रेंड्स स्कूल 100 नंबरी मध्ये
सुनील भंडारे पाटील
फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट ,कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) या संस्थेच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा विसाव्या वर्षी कायम राखली आहे,
सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून , 97 टक्के विद्यार्थी हे फर्स्ट क्लास च्या वरती आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण संपादन करून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे संस्थेचे अध्यक्ष ,सचिव ,संचालक मंडळ ,मुख्याध्यापिका , उपमुख्याध्यापिका,शिक्षक वृंद तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .
विद्यार्थ्यांच्या यशामागे सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत महत्त्वाची ठरली .असल्याचे मत संस्थेचे सचिव दिलीप भोसले यांनी व्यक्त केले .संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरेंगे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या. शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
![]()
