HomeAlandiअखिल भारत हिंदू महासभेचा एल्गार पवित्र इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी प्रशासनाला ठोकले निवेदन...

अखिल भारत हिंदू महासभेचा एल्गार पवित्र इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी प्रशासनाला ठोकले निवेदन अन्यथा आंदोलनाचा इशारा

अखिल भारत हिंदू महासभेचा एल्गार! पवित्र इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी प्रशासनाला ठोकले निवेदन; अन्यथा आंदोलनाचा इशारा

पुणे/आळंदी प्रतिनिधी

तीर्थक्षेत्र आळंदीची जीवन वाहिनी असलेल्या आणि लाखो वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीच्या दुरवस्थेबाबत आता अखिल भारत हिंदू महासभेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नदीतील वाढते प्रदूषण, सांडपाणी आणि जलपर्णीच्या विळख्यातून इंद्रायणीला मुक्त करण्यासाठी महासभेच्या वतीने प्रशासनाला कडक शब्दांत निवेदन देण्यात आले आहे.

अखिल भारत हिंदू महासभेचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष वैभवराज रौंदळ आणि नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

महासभेच्या प्रमुख मागण्या आणि ‘बेधडक’ मुद्दे:

१. सांडपाणी थेट नदीत सोडणे बंद करा: आळंदीतील मैलापाणी आणि ड्रेनेजचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणीत सोडले जात आहे. हे तत्काळ थांबवून सांडपाण्यावर पुनर्वापर प्रक्रिया राबवावी.

२. जलपर्णी आणि राडारोडा हटवा: नदीपात्रात साचलेली जलपर्णी आणि टाकाऊ राडारोडा यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. हे अडथळे दूर करून पाणी प्रवाही करावे.

३. जलशुद्धीकरण आवश्यक: नदीचे पाणी पिण्यायोग्य आणि स्नानासाठी शुद्ध राहावे, यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प प्रभावीपणे राबवावा.

४. बंधाऱ्याची दुरुस्ती: पाणी साठवण बंधाऱ्याची गळती रोखण्यासाठी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.

५. पोलीस पेट्रोलिंग: नदी परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर व अवैध कृत्ये करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी नियमित पोलीस गस्त सुरू करावी.

“धार्मिक भावनांशी खेळू नका!”

“इंद्रायणी नदीचे पावित्र्य राखणे हे केवळ आमचे कर्तव्य नसून प्रशासनाचीही जबाबदारी आहे. जर प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर अखिल भारत हिंदू महासभा आपल्या स्टाईलने आंदोलन छेडेल,” असा स्पष्ट इशारा वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष वैभवराज रौंदळ यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रीय संरक्षक श्री. श्री. 1008 जगतगुरू स्वामी माधवानंद सरस्वती जी महाराज, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ~योगेंद्र वर्मा जी, राष्ट्रीय धर्म प्रचारक ~महंत शिवनाथ जी महाराज, राष्ट्रीय उपाध्यक्ष ~ योगी दादानाथ जी महाराज, राष्ट्रीय धर्म प्रचारक योगी ऋषिकेशनाथ जी महाराज, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य ~ महंत सचिदानंद सरस्वती जी महाराज, महंत योगानंद सरस्वती जी महाराज, महंत केशवानंद सरस्वती जी महाराज, भावेश बळीराम पाटील., प्रदेश प्रभारी योगी सिद्धनाथ जी महाराज, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष योगी शीतलनाथ जी महाराज, योगी प्रकाशनाथ जी महाराज, योगी सुंदरनाथ जी महाराज, योगेश (सर)निंबाळकर,महाराष्ट्र राज्य महिला प्रभारी राणी पवार, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष आरती राजपूत,जिल्हा अध्यक्ष प्रिया राव,जिल्हा उपाध्यक्ष पुनम गांगुर्डे, विधी विभाग पदाधिकारी अंकित वाघ, दिनेश माळी, अजिंक्य महांकाळे, पत्रकार पदाधिकारी शशिकांत शिंदे, विष्णू भाऊ बिचकुले,अशोक कुमार नानू राठोड सर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या निवेदनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, वारकरी संप्रदाय आणि स्थानिक नागरिकांनी या भूमिकेचे स्वागत केले आहे.

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!