लोणीकंद पेरणे जि प गटात खळबळ प्रदीप भाऊ कंद यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
भरारी न्युज वृत्तसेवा
संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून असणाऱ्या लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये प्रदीपभाऊ कंद यांनी नुकताच शिरूर हवेली मतदारसंघाचे आमदार माऊली आबा कटके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठा बदल झाला आहे,
प्रदीप भाऊ कंद हे पूर्वीपासूनच अजित दादा पवार समर्थक होते, परंतु राजकीय वर्तुळातील वातावरण पाहता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला,
कंद हे माजी आमदार अशोक बापू पवार तसेच शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्यांनी कॉलेज जीवनापासून या पक्षाचे कायम नेतृत्व केले होते, विद्यार्थी दशेत असताना त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी युवक काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले,
परंतु राजकीय क्षेत्रातील जडणघडण पाहता उशिरा का होईना परंतु अजितदादा समर्थक म्हणून त्यांनी आपली भूमिका सिद्ध केलेली आहे, आगामी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अजित दादांच्या समक्ष राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली, प्रदीप भाऊंच्या या निर्णयामुळे लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात खळबळ उडाली असून त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे,
