March 30, 2026
संतुलनच्या संस्थापिका ॲड पल्लवी रेगे यांना शिव सन्मान पुरस्कार

संतुलनच्या संस्थापिका ॲड पल्लवी रेगे यांना शिव सन्मान पुरस्कार

सुनील भंडारे पाटील

अखंड समाजसेवेचा वसा उचलणाऱ्या संतुलन संस्थेच्या संस्थापिका , संचालक एडवोकेट पल्लवीताई रेगे यांचा पुणे येथील ऐतिहासिक लाल महाल मधील भव्य अशा शिव गौरव गाथा सोहळ्यामध्ये सन्मान करण्यात आला,

एडवोकेट बी एम रेगे व एडवोकेट पल्लवीताई रेगे यांचे सामाजिक कार्य अनन्य साधारण आहे, त्यांनी गोरगरीब दगडखाण कामगार यांच्या अनेक प्रश्नांबाबत शासन दरबारी मागण्यामाडून मान्यता देखील मिळवली आहे, सरकारच्या व शासनाच्या विरोधात उपोषणाचे शस्त्र उपसून न्याय मिळवला आहे, त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे,

संतुलन संस्थेच्या संस्थापिका तसेच संचालिका अँड पल्लवी रेगे यांना उत्कृष्ट सामाजिक कार्यबद्दल श्री. शंभुराज्याभिषेक ट्रस्ट, पुणे यांचे वतीने उप मुख्यमंत्री वैद्यकिय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचे शुभहस्ते लाल महाल येथे भव्य शिव गौरव गाथा सोहळ्यात ‘शिव सन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यांना या मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे,